रत्नागिरीच्या शैक्षणिक वाटचालीत आपले नाव अधोरेखित करणा-या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के प्रशाला ही कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणा-या या प्रशालेच्या प्रांगणात बालवर्गापासून १२ वी पर्यंत सुमारे २५०० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.
सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने टयुटोरियल स्कूल चालविण्यास ताब्यात घेतले. त्यावेळी कै.रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून टयुटोरियल स्कूलचे नामकरण रा.भा.शिर्के प्रशाला असे करण्यात आले.
अधिक वाचा